चालू, बंद, कोरडे, हंगामी चालणारे, गुळण्या मारणारे व इतर अश्या सर्व नवीन आणि जुन्या बोअरवेल वर ही प्रक्रिया करता येते. विशेषतः नवीन मारलेल्या प्रत्येक बोअरवेल ला ही ट्रीटमेंट करूनच पंप टाकावे असे सुचविले आहे. बोअरवेल मारताना आलेल्या गाळ – मातीमुळे बंद झालेले झरे हे मोकळे होतात आणि बोअरवेल चा दाब कमी होतो. खरे तर फक्त पाणी वाढविण्यासाठी म्हणून नव्हे तर घेतलेले बोअरवेल हे भविष्यात उत्तम पाणी देण्यासाठी पूर्णपणे शात्रीय व तांत्रिकदृष्टया तयार आणि विकसित करण्यासाठी ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
