बंद, कोरडे, फेल आणि चालू बोअरवेल ला पाणी वाढविणे

जलसंजीवन केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट

हि ट्रीटमेंट म्हणजे बंद व कोरड्या बोअरवेल मुळे शेतकरी मित्रांना होणारे आर्थिक नुकसान पासून वाचविण्यासाठी व असे अनेक निरुपयोगी बोअरवेल मारून जमिनीचा होणारा ऱ्हास व प्रदूषण टाळण्यासाठी आहे.

श्री. विशाल बगले यांची ‘जलसंजीवन’ केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट

अवेळी पडणारा पाऊस, कमी पुरवठा देणारे नदी व तलाव, बांध आणि कॅनाल यांची कमतरता आणि अयोग्य वापर यामुळे शेतकरी हा पाण्यासाठी पूर्णपणे बोअरवेल वर अवलंबून आहे. त्यात कमी पाणी देणारे, काही अगदी बंद व कोरडे असलेले बोअरवेल त्यामुळे विशेषतः उन्ह्याळ्यात शेतकऱ्यांसमोर पाण्याची भीषण समस्या उद्भवते. हीच समस्या ओळखून खनिज अभियंता श्री. विशाल बगले हे गेल्या २० वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात बोअरवेल ला पाणी वाढविण्यासाठी ‘जलसंजीवन’ केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट करतात. ही एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया -केमिकल ट्रीटमेंट आहे. त्यांचे वडील स्वतः ड्रिलिंग अभियंता व भूगर्भ शास्त्रज्ञ श्री. अशोक बगले यांनी सुरुवात केलेल्या या प्रयोगावर बऱ्याच वर्षांपासून निरंतर संशोधन करून आता श्री. विशाल बगले यांनी अगदी कमी खर्चात आणि कमी वेळेत होणारे, सोयीस्कर आणि उत्तम निकाल देणारे केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. संपूर्ण भारतात अशा प्रकारचे आणि या दर्जाचे काम कोणीच करत नाही.

श्री. विशाल बगले यांची ओळख

श्री. विशाल बगले यांनी भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्था म्हणजे आय आय टी. (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) धनबाद, जे संपूर्ण जगात गेल्या ९० वर्षांपासून भूगर्भ शास्त्र निगडित अभ्यासक्रमासाठी नावाजलेले आहे, येथून खनिज अभियंता ही पदव्यूत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत सरकार येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्य केले आहे. त्यांना सायन्स अँड इंजिनीरिंग रिसर्च बोर्ड, भारत सरकार यांचे प्रतिष्ठित फेलोशिप मिळाले आहे. श्री. बगले यांनी केलेल्या बोअर केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट चा लाभ आज पर्यंत हजारो शेतकऱ्यांनी घेतला आहे व त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांचे प्रेम व आशीर्वाद मिळत आहे.

श्री. विशाल बगले यांच्या कामाची उल्लेखनीय दखल

मा. केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब यांनी स्वतः काही बोअरवेल वर ही ट्रीटमेंट करवून घेतली आणि ट्रीटमेंटचे उत्तम निकाल बघून त्यांनी श्री. विशाल बगले यांचे कौतुक केले व तसेच त्यांना विशेष प्रशंसा पत्र बहाल केले. तसेच त्यांनी या ट्रीटमेंट व प्रयोगाची दखल घेऊन याची माहिती मा. केंद्रीय कृषी मंत्री , मा. केंद्रीय जलशक्ती मंत्री , आणि महाराष्ट्राचे मा. कृषी मंत्री, व महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री यांना पत्र लिहून पाण्याची अडचण दूर करण्यासाठी या ट्रीटमेंट ची शिफारस केली आहे. याच संदर्भात श्री. विशाल बगले यांना कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय तर्फे दिल्ली येथील कृषी भवन येथे चर्चे साठी आमंत्रण दिले होते. तसेच मा. केंद्रीय मंत्री यांनी याची दखल घेऊन प्रमुख सचिव (जल संसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग, जल शक्ती मंत्रालय) यांना श्री विशाल बगले यांच्याशी चर्चेसाठी सुचविले आहे. विशाल बगले यांची माननीय श्री. शरद पवार साहेब यांच्याशी या विषयासंदर्भात भेट झाली असून त्यांनी देखील या कामाची दखल घेऊन पुढील कार्यवाही साठी मार्गदर्शन केलेले आहे.

काय आहे ही ट्रीटमेंट?

केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट पूर्वीपासून जगभरात इंधन विहिरी (OIL Well) साठी वापरली जाते. पेट्रोलियम पदार्थ किव्हा क्रूड ऑइल काढण्यासाठी मारलेल्या बोअरवेल चे उत्पादन वाढविण्यासाठी ही प्रक्रिया वापरली जाते. स्वर्गीय श्री. अशोक बगले (भूगर्भशात्रज्ञ व ड्रिलिंग अभियंता) आणि श्री. विशाल अशोक बगले (खनिज अभियंता) ह्यांच्याद्वारे विकसित तशीच प्रक्रिया काही वेगळे केमिकल्स तसेच विशिष्ट कॉम्पोजिशन आणि कॉन्सन्ट्रेशन वापरून पाण्याचे बोअरवेल चे उत्पादन (पाणी) वाढविण्यासाठी केली जाते. सदर प्रक्रिया पूर्णपणे विज्ञान शास्त्र आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञान वर आधारित आहे. विशेषतः ही प्रक्रिया फारच सोयीस्कर, कमी खर्चिक व उत्तम निकाल देणारी आहे.

सोपे आणि सोयीस्कर प्रक्रिया

हे ‘जलसंजीवन’ केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट प्रकिया करण्यासाठी कसल्याही पूर्वतयारीची गरज पडत नाही. ट्रीटमेंट करण्यासाठी फक्त १५ मिनिटे ते अर्धा तास लागते. तसेच ट्रीटमेंट करण्यासाठी बोअरवेल मधले पंप, पाईप इत्यादी काढणे गरजेचे नाही. पंप असेल अथवा नसेल तरीही ट्रीटमेंट करता येते. केमिकल चा पंप आणि इतर साहित्यावर कसलाही अपाय होत नाही. ट्रीटमेंट झाल्यानंतर बोअरवेल (पंप) २ दिवस बंद ठेवावे लागते (पाण्याचा उपसा घ्यावयाचे नाही) आणि २ दिवसानंतर पंप चालवून पाण्यात झालेली वाढ बघू शकतो. ट्रीटमेंट करताना पंप नसल्यास ट्रीटमेंट झाल्यानंतर २ दिवसानंतर पासून पुढे पंप टाकून पाण्यात वाढ बघू शकतो.

जलसंजीवन ट्रीटमेंट व यासाठी येणारा खर्च

हि ट्रीटमेंट अगदी तुमच्या शेतात येऊन दिली जात असल्याने त्या मागे बऱ्याच खर्चिक बाब असतात. जसे कि येण्या-जाण्याचा खर्च, दिवसाचा जेवणाचं खर्च, केमिकल चा खर्च, वापरले जाणाऱ्या उपकरण्यांचा खर्च, काम करणाऱ्या माणसांचा पगार, राहण्याचा खर्च व इतर अनेक छोटे मोठे खर्च असतात. तरीही हि सेवा / ट्रीटमेंट फारच माफक व अत्यल्प दरात दिली जाते. घेतला जाणारा खर्च हे, हि ट्रीटमेंट आपल्या बोअरवेल ला करण्यासाठी घेतली जाते, पाणी वाढविण्याची हमी देण्यासाठी नव्हे. पाणी हे अमूल्य आहे आणि वाढ होण्याऱ्या पाण्याची कसलेही किंमत लावता येत नाही. तरी माझ्या सर्व शेतकरी मित्रांनी ट्रीटमेंट पूर्वी आणि नंतरही ह्या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

अनुभवातून ट्रीटमेंट नंतर मिळणारा निकाल

प्रत्येक बोअरवेलला मिळणारा निकाल हा वेगवेगळा असतो. काही बोअरवेल ला फार जास्त पाणी वाढते तर काही बोअरवेलला कमी पाण्याची वाढ होते. ट्रीटमेंट केल्यानंतर दोन दिवस बोअरवेल बंद ठेवले जाते, नंतर पुढे ५ दिवसांनंतर पासून ते महिनाभर पाण्याची वाढ सुरु असते. पाण्याची वाढ हि साधारण ५-६ दिवसानंतरच दिसायला सुरु होते. प्रत्येक बोअरवेल पॉईंट च्या भूगर्भ रचनेवर त्या बोअरवेल ला मिळणार निकाल अवलंबून असतो, त्यामुळे, कुठल्याही बोअरवेल ला ट्रीटमेंट नंतर पाण्याची वाढ होईलच असे १०० खात्रीने सांगता येत नाही. केली जाणारी ट्रीटमेंट हि विज्ञान आणि तंत्रज्ञान वर आधारित असल्याने त्यालाही मर्यादा आहेत. आम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करू शकतो पण, पाणी वाढविण्याची १०० टक्के खात्री (गॅरंटी) आम्ही देत नाही.

साधारण चालू बोअरवेल (ज्या बोअरवेलला पाणी अर्धा – एक तास किंवा त्या पेक्षा जास्त चालते) अशा बोअरवेलला या केमिकल ट्रीटमेंट नंतर पाण्यामध्ये साधारण ४० ते ५० टक्के वाढ ही नक्की होते. म्हणजेच पाण्यात दीडपटीने वाढ होतेच असे मागील निकालावरून आणि अनुभवावरून सांगता येते. उदाहरणार्थ, जर ट्रीटमेंट पूर्वी एका बोअरवेल मधून दिवसभरातून ५०,००० लिटर पाणी मिळत असेल तर ट्रीटमेंट नंतर त्या मध्ये आणखी किमान २०,००० ते २५,००० लिटर पाण्याची वाढ ही नक्की होते. म्हणजेच दिवसभरातून किमान ७०,००० ते ७५,००० लिटर पाणी मिळते.

चालू बोअरवेल ला प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना सुरुवातीचे १ ते २ तास पाण्याचे विसर्ग मोजायला सांगितले जाते. एखादे १०० अथवा २०० लिटर चे बॅरल घेऊन पाणी किती मिनिटात भरते याचे मोजमाप करायला सांगितले जाते. तसे प्रत्येक १५ मिनिटाच्या फरकाने एक ते दोन तास शेतकरी मित्रांनी पाण्याचा विसर्ग मोजून सांगायला हवे, जेणेकरून ट्रीटमेंट नंतर पाण्यात झालेली वाढ ही मोजमाप करून बघता येते. बऱ्याचदा एक तास, दोन तास किंवा त्या पेक्षा जास्त वेळ चालणाऱ्या बोअरवेल मध्ये पाण्यात झालेली वाढ ही डोळ्याने दिसून येत नाही. पाण्याची पडणारी धार ही सारखीच वाटते. पण असे मोजमाप केले असल्यास दीड पट म्हणजेच ४० ते ५० % पाण्याची वाढ ही दिसून येते. प्रत्येक शेतकरी मित्रांना सहज जमेल अशी ही साधी मोजमाप पद्धत आहे. असे मोजमाप केले नसल्यास पाण्यात झालेली किंवा न झालेली वाढ लक्षात येत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनी या प्रकारची साधी आणि सोपी मोजमाप करून पहावी ही नम्र विनंती. असे मोजमाप केले असल्यासच सांगितलेले बदल दखविणे आणि सिद्ध करणे शक्य होते अन्यथा कसलेही निवारण करणे शक्य नाही.

ट्रीटमेंट करताना बंद, कोरडे, किंवा ५ मिनिटे, १० मिनिटे, २० मिनिटे आणि अर्धा तासापेक्षा कमी चालणारे प्रत्येक बोअरवेल ह्यांना कोरडे बोअरवेल समजूनच ही ट्रीटमेंट केली जाते कारण अशा बोअरवेलचा शेतीसाठी फारसा उपयोग घेता येत नाही. अशा सगळ्या बोअरवेल मध्ये ट्रीटमेंट केले असता साधारण ७० – ८० % यशस्विता वर्तविता येते. म्हणजेच साधारण १०० मधील ७० ते ८० बोअरवेल हे चालू होतात आणि साधारण १ तास ते ५ तास किंवा त्या पेक्षा जास्त चालतात. मात्र उर्वरित २० बोअरवेल ला काही फरक पडत नाही किंवा अगदी कमी कमी फरक पडतो. अशा २० टक्के बोअरवेल चे जीओलॉजिकल- भौगोलिक जागा चुकलेली असते म्हणजेच पाण्यासाठी आवश्यक असणारी भूगर्भरचना पाण्यासाठी तेथे पूरक नसते. तेथे या ट्रीटमेंट चा फायदा होत नाही. त्यामुळे अशा सर्व बोअरवेल च्या बाबतीत ट्रीटमेंट नंतर निकालाची कसलीही शाश्वती देता येत नाही. या कारणाने २० ते ३० टक्के शेतकरी अपेक्षित निकाल न मिळाल्याने नाराज होतात मात्र १०० मधील ज्या ७० ते ८० शेतकऱ्यांचे बंद, कमी व कोरडे बोअरवेल चे पाणी हे चांगल्या प्रमाणात वाढलेले असते असे शेतकरी मात्र आनंदी आणि समाधानी होतात. त्यांचे कोरड्या बोअरवेल मुळे होणारे आर्थिक नुकसान थांबते आणि शेतीला पुरेशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था होते. त्यामुळे नवीन बोअरवेल घेण्यापेक्षा कोरड्या किंवा कमी चालणाऱ्या बोअरवेल ला ही ट्रीटमेंट केलेली कधीही सोयीस्कर ठरते.

जे बोअरवेल हे काही वर्षे चालून अचानक बंद होतात अश्या बोअरवेल ला लगेच ट्रीटमेंट दिल्यास सर्रास ९५ % बोअरवेल हे पुन्हा सुरु होतात.

आता पर्यंत च्या अनुभवावरून आणि निकालावरून असे आढळून आले आहे कि गुळण्या मारताना पाणी बंद होण्याचे किव्हा कमी फेकण्याचे वेळ हे २ मिनिट्स पेक्षा कमी असेल तर सर्रास गॅप निघून जाते आणि पाणी सतत चालते. जर २ मिनिट्स पेक्षा जास्त गॅप असेल तर गॅप घेण्याचा वेळ कमी होतो पण तो पूर्ण पणे निघेल अथवा नाही हे सांगता येत नाही.

पाण्याचा वापर आणि संवर्धन

‘जलसंजीवन’ हि केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट वापरून बोअरवेलला पाणी वाढवू शकत असलो तरी पाणी निसर्गानी आपल्याला दिलेली एक अमूल्य देणगी आहे त्यामुळे पाणी फार जपून वापरावे अशी माझ्या सर्व शेतकरी मित्रांना कळकळीची विनंती आहे. शक्य तेवढा ठिबक सिंचनाचा वापर करावा आणि पाण्याची बचत कशी होईल यासाठी अद्ययावत अश्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, जेणेकरून पाण्याचा अनावश्यक वापर थांबेल आणि पिकात ही भरघोस वाढ होईल. शक्य तिथे पावसाचे पाणी मुरण्यासाठी आणि साठविण्यासाठी व्यवस्था करावी. आपल्या शेताजवळील नैसर्गिक नाले, ओढे, नदीपात्र हे गाळमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्याला पाणी वाढवून मिळण्यासाठी मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पाणी संवर्धनात आपली साथ ही तितकीच मोलाची आहे.

“अमूल्य आहे जलसंपदा, वापर तिचा जपून करा”

श्री. विशाल बगले यांच्या कामाचे यशस्वी अनुभव

जलसंजीवन केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट
बंद, कोरडे, फेल आणि चालू बोअरवेल ला पाणी वाढविणे

ट्रीटमेंट ची बुकिंग करण्यासाठी, ट्रीटमेंट संदर्भात माहिती मिळवण्यासाठी किंव्हा बोअरवेल बद्दल इतर कुठल्याही आपल्या शंकेसाठी आपण खालील नंबर वर, सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत, कॉल करून संपर्क करू शकता.