प्रत्येक बोअरवेलला मिळणारा निकाल हा वेगवेगळा असतो. काही बोअरवेल ला फार जास्त पाणी वाढते तर काही बोअरवेलला कमी पाण्याची वाढ होते. ट्रीटमेंट केल्यानंतर दोन दिवस बोअरवेल बंद ठेवले जाते, नंतर पुढे ५ दिवसांनंतर पासून ते महिनाभर पाण्याची वाढ सुरु असते. पाण्याची वाढ हि साधारण ५-६ दिवसानंतरच दिसायला सुरु होते. प्रत्येक बोअरवेल पॉईंट च्या भूगर्भ रचनेवर त्या बोअरवेल ला मिळणार निकाल अवलंबून असतो, त्यामुळे, कुठल्याही बोअरवेल ला ट्रीटमेंट नंतर पाण्याची वाढ होईलच असे १०० खात्रीने सांगता येत नाही. केली जाणारी ट्रीटमेंट हि विज्ञान आणि तंत्रज्ञान वर आधारित असल्याने त्यालाही मर्यादा आहेत. आम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करू शकतो पण, पाणी वाढविण्याची १०० टक्के खात्री (गॅरंटी) आम्ही देत नाही.
चालू बोअरवेल (एक तास किव्हा त्या पेक्षा जास्त चालणारे)
साधारण चालू बोअरवेल (ज्या बोअरवेलला पाणी अर्धा – एक तास किंवा त्या पेक्षा जास्त चालते) अशा बोअरवेलला या केमिकल ट्रीटमेंट नंतर पाण्यामध्ये साधारण ४० ते ५० टक्के वाढ ही नक्की होते. म्हणजेच पाण्यात दीडपटीने वाढ होतेच असे मागील निकालावरून आणि अनुभवावरून सांगता येते. उदाहरणार्थ, जर ट्रीटमेंट पूर्वी एका बोअरवेल मधून दिवसभरातून ५०,००० लिटर पाणी मिळत असेल तर ट्रीटमेंट नंतर त्या मध्ये आणखी किमान २०,००० ते २५,००० लिटर पाण्याची वाढ ही नक्की होते. म्हणजेच दिवसभरातून किमान ७०,००० ते ७५,००० लिटर पाणी मिळते.
पाणी वाढीची सोपी मोजमाप पद्धत
चालू बोअरवेल ला प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना सुरुवातीचे १ ते २ तास पाण्याचे विसर्ग मोजायला सांगितले जाते. एखादे १०० अथवा २०० लिटर चे बॅरल घेऊन पाणी किती मिनिटात भरते याचे मोजमाप करायला सांगितले जाते. तसे प्रत्येक १५ मिनिटाच्या फरकाने एक ते दोन तास शेतकरी मित्रांनी पाण्याचा विसर्ग मोजून सांगायला हवे, जेणेकरून ट्रीटमेंट नंतर पाण्यात झालेली वाढ ही मोजमाप करून बघता येते. बऱ्याचदा एक तास, दोन तास किंवा त्या पेक्षा जास्त वेळ चालणाऱ्या बोअरवेल मध्ये पाण्यात झालेली वाढ ही डोळ्याने दिसून येत नाही. पाण्याची पडणारी धार ही सारखीच वाटते. पण असे मोजमाप केले असल्यास दीड पट म्हणजेच ४० ते ५० % पाण्याची वाढ ही दिसून येते. प्रत्येक शेतकरी मित्रांना सहज जमेल अशी ही साधी मोजमाप पद्धत आहे. असे मोजमाप केले नसल्यास पाण्यात झालेली किंवा न झालेली वाढ लक्षात येत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनी या प्रकारची साधी आणि सोपी मोजमाप करून पहावी ही नम्र विनंती. असे मोजमाप केले असल्यासच सांगितलेले बदल दखविणे आणि सिद्ध करणे शक्य होते अन्यथा कसलेही निवारण करणे शक्य नाही.