मा. केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब यांनी स्वतः काही बोअरवेल वर ही ट्रीटमेंट करवून घेतली आणि ट्रीटमेंटचे उत्तम निकाल बघून त्यांनी श्री. विशाल बगले यांचे कौतुक केले व तसेच त्यांना विशेष प्रशंसा पत्र बहाल केले. तसेच त्यांनी या ट्रीटमेंट व प्रयोगाची दखल घेऊन याची माहिती मा. केंद्रीय कृषी मंत्री , मा. केंद्रीय जलशक्ती मंत्री , आणि महाराष्ट्राचे मा. कृषी मंत्री, व महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री यांना पत्र लिहून पाण्याची अडचण दूर करण्यासाठी या ट्रीटमेंट ची शिफारस केली आहे. याच संदर्भात श्री. विशाल बगले यांना कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय तर्फे दिल्ली येथील कृषी भवन येथे चर्चे साठी आमंत्रण दिले होते. तसेच मा. केंद्रीय मंत्री यांनी याची दखल घेऊन प्रमुख सचिव (जल संसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग, जल शक्ती मंत्रालय) यांना श्री विशाल बगले यांच्याशी चर्चेसाठी सुचविले आहे. विशाल बगले यांची माननीय श्री. शरद पवार साहेब यांच्याशी या विषयासंदर्भात भेट झाली असून त्यांनी देखील या कामाची दखल घेऊन पुढील कार्यवाही साठी मार्गदर्शन केलेले आहे.
